26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरएमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला भीषण आग

एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला भीषण आग

सोलापूर : येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला असून आग विझविण्याचे त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आतापर्यंत १५ गाड्या (बंब) पाणी मारले आहे, पण आग आटोक्यात आलेली नाही. कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. बघ्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली आहे. ही आग पसरणार नाही, याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली जात आहे.
एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आग लागली असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आतापर्यंत लाखोंचा माल आगीत भस्मसात झाला आहे. आतापर्यंत १५ गाड्या पाणी मारले, पण आणखी काही तास लागतील पूर्णपणे आग विझायला.असे सोलापूर महापालिका अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR