34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयतैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती

तैपेई : तैवानची राजधानी तैपेई आज (बुधवारी) जोरदार भूकंपाने हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी होती. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की यानंतर तैवान आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

तैवानच्या हुआलियनमधून भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हीडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळताना दिसत आहेत. भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या भूकंपाचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाच मजली इमारत झुकल्याचे दिसत आहे.

भूकंपामुळे अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक लोक इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या भूकंपामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ओकिनावा प्रांताच्या आसपासच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या त्सुनामी लाटा तीन मीटरपर्यंत उंच असू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR