30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरकाँग्रेसची गॅरंटी सर्वांचे जीवन समृद्ध करणारी

काँग्रेसची गॅरंटी सर्वांचे जीवन समृद्ध करणारी

लातूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेली गॅरंटी शेतकरी, शेतमजूर, महिला, सुशीक्षीत बेरोजगार, ज्येष्ठ नागरीक या सर्वांचे जीवन समृद्ध करणारी असल्यामुळे मतदारांनी डॉÞ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केलेÞ.

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉÞ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ दिÞ ४ मे रोजी सायंकाळी मुरुड येथे सौ. राणी कोळी व राणी खोडसे यांच्या निवासस्थानी, व्हॉली बॉल मैदान, सिध्दी विनायक मंदीर परीसर येथे व माजी संचालक राजेंद्र मस्के, चव्हाणवाडी यांच्या निवास्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी सुनिताताई अरळीकर, विलास कारखान्याचे संचालक अमर मोरे, माजी सरपंच अभयंिसह नाडे, दीपक पटाडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस डॉÞ. दिनेश नवगिरे राजेंद्र मस्के, आकाश कणसे, इश्वर चांडक, प्राणी खोडसे, जयश्री पांगळ, शीला वाकूरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुमन लांडगे, जयश्री तवले, शाहनूर पठाण, सुमन आल्टे, हसीना पठाण, शहाणुर पठाण, शामल थोरात, रहना सय्यद, विमल गायकवाड, पप्पू सुरवसे, जगन चव्हाण हे उपस्थित होतेÞ.

चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या की, लातूर लोकसभेसाठी आपण महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाकडून सुसंस्कृत उच्चशिक्षीत, उमेदवार भूमिपुत्र सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. लातूर येथील राजकीय परंपरेला साजेसे डॉ. शिवाजी काळगे उमेदवार आहेत. देशातील महिलांना प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी काँग्रेस पक्षाची विचारधारा महत्वाची आहे. काँग्रेस पक्षाने शिक्षण, रोजगार, राजकारण आरोग्य, नोकरी, समाजकारण या सर्व क्षेत्रात स्त्रीयांना पुरूषाच्या बरोबरीने संधी दिली. काँग्रेस पक्षाने स्त्री शक्तीचे महत्व ओळाखून त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम आणि धोरणांच्या माध्यमातून काम केले. यामुळे देशात पून्हा स्त्रीशक्तीला संधी मिळण्यासाठी इंडीया आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून यासाठी आपण आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

विद्यमान खासदाराने जनतेचे प्रश्न सोडवले नाहीतÞ. केंद्रातील विकास योजना आणल्या नाहीतÞ भाजपाच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात लातूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांनी कोणती विकासकामे केलीत त्याचा हिशेब जनतेला द्यावा, असे आवाहन करुन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, विद्यमान खासदाराने जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यांच्या सुख-दु:खात सहकार्य केले नाहीÞ. केंद्रातील विविध विकासाच्या योजना मतदारसंघात आणल्या नाहीतÞ. पाच वर्षे काहींच काम न करता ते पुन्हा मते मागत आहेतÞ, मतदारांनी त्यांना जाब विचारावाÞ. काँग्रेस महाविकास आघाडीने डॉÞ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने उच्चशिक्षीत, कार्यतत्पर उमेदवार दिला आहेÞ. डॉÞ. काळगे यांना मतदारांनी संधी दिल्यास ते मतदारसंघासाठी २४ तास उपलब्ध राहणार आहेतÞ, त्यामुळे मतदारांनी डॉÞ. काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केलेÞ. या बैठकीत सौ सुनात आरळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस उत्तम चव्हाण, उध्दव चव्हाण, संगीता चव्हाण, रविना काळोखे, जयमाला चव्हाण, यमुना मस्के आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR