30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमराठा समाजाला आरक्षण मिळणारच : मुंडे

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच : मुंडे

बीड : राज्यातील तिस-या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या असून चौथ्या टप्प्यातही ११ मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये, राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातही निवडणूक होत आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. मात्र, बीड जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना रंगल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे, प्रचारसभेत बोलताना उमेदवारांकडूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज पाटोदा या ठिकाणी प्रचार सभा घेतली असून या प्रचार सभेत बोलताना आपण देखील कायद्याने मिळणा-या मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचे त्यांनी म्हटले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी आपला पराजय स्वीकारला असून ते हरण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे पंकजा यांनी म्हटले. मी कायद्याने मिळणा-या मराठा आरक्षणाच्या बाजूने असून मुंडे साहेबांची देखील हीच भूमिका होती, असे पंकजा मुंडे यांनी सभेत बोलताना सांगितले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण कशासाठी हवे? असा प्रश्न देखील सभा सुरू असताना पंकजा यांनी मराठा तरुणांना विचारला. शिक्षणात आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका आमची असून माझ्या विजयामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावे. आरक्षण तर मिळणारच आहे, आपण सर्व एकच आहोत असे देखील पंकजा यांनी येथील सभेत बोलताना म्हटले.

दरम्यान, बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात मराठा समाज एकटवल्याचे दिसून येत आहे. तर, जरांगे यांच्या नेतृत्त्वात बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बैठकाही होतात. त्यामुळेच, येथील निवडणुकीला काही प्रमाणात जातीय रंग मिळाला असून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद दिसून येत आहे. मात्र, दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा दाखला देत पंकजा मुंडेंकडून मराठा समाजालाही साद घातली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR