30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरसत्ता पक्षाचे चारसौपार आता जुमला ठरणार

सत्ता पक्षाचे चारसौपार आता जुमला ठरणार

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापुर्वीपासुन सत्ता पक्षाने ‘अबकी बार चारसौपार, अशी घोषणा दिलीÞ परंतू, पहिला आणि दुस-या टप्प्यातील मतदानानंतर निवडणुकीचा जो अंदाज व्यक्त करण्यात आला त्यात सत्तापक्ष एनडीएपेक्षा इंडिया आघाडीला मतदारांनी पसंती दिल्याचे समोर आलेÞ त्यामुळे सत्तापक्षाच्या पायाखालची वाळू घसरत चालली असून सत्ता पक्षाचे चारसौपार आता निवडणुकीचा एक जुमला ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता दि. ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता झालीÞ तत्पुर्वी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने दुपारी ३ वाजता येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या प्रसंगी माजीमंत्री आमदार अमित देशमुख पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होतेÞ यावेळी आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी मंत्री विनायकराव पाटील, लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ऍड. किरण जाधव, शेकापच्या नेत्या आशाताई शिंदे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा र्प्रमुख बालाजी रेड्डी, सुनील बसपूरे, शेकापचे अ‍ॅड. उदय गवारे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अमर खानापूरे, ऍड. समद पटेल, व्यंकटेश पुरी यांची उपस्थिती होती.

देशात लोकसभेची निवडणुक इंडिया विरुद्ध एनडीए, राज्यात काँग्रेस महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीला पूर्व, पश्चिम, दक्षीण व उत्तर भारतात मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे चित्र असल्याचे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास जागा वाटपासून उमेदवारांच्या निवडीपर्यंत, प्रचाराच्या शुभारंभापासून ते प्रचाराच्या सांगतेपर्यंत आघाडी घेतली आहेÞ त्यामुळे मराठवाड्यातील आठ जागांपैकी आठही जागा काँग्रेस महाविकास आघाडी जिंकेल. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस महाविकास आघाडीला २/३, दुस-या टप्प्यात २/३ तर तीस-या टप्प्यातही २/३ जागा मिळतील.

लातूर लोकसभा मतदारसंघातील कॉग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा मतदारांनी प्रचंड पाठींबा दिला. त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा मतदारांना भावली, असे सांगुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, काँग्रेस महाविकास आघाडीच्या विजयात उमेदवार निवड महत्वपुर्ण ठरली. डॉ. काळगेंना मतदारसंघातील मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांची विजयाकडे घोडदौड सुरु आहेÞ संविधानाच्या रक्षणाची लढाई डॉ. काळगे यांनी लढली. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, विकासरत्न विलासराव देशमुख, केशवराव सोनवणे, भाई उद्धवरा पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वारसा डॉ. शिवाजी काळगे पुढे घेऊन जाणार आहेत.

सत्ताधा-यांच्या डोक्यात हवा भरली होती. त्यामुळे ते तिच ती आश्वासने देत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लातूरला आले परंतू, त्यांनीही जुनीच आश्वासने दिली. मतदार त्यांच्या या आश्वासनाला कंटाळला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला बहुताचे मॅजिक फिगरही गाठता येणार नाही. त्यांची दमछाक झाली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे पाच न्याय, २५ गॅरंटीचे मतदारांनी मोठे स्वागत केले आहे. सत्तापक्षाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान वैयक्तिक टिके पलिकडे काहींच केले नाही. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्ट्रीतून मेट्रो रेल्वे बोगी निघतील असे सांगण्यात आले. त्यानंतर बुलेट ट्रेन बोगी निघतील म्हणाले पुढे वंदे भारतच्या बोगी निघतील असे सांगत आहेत. त्यामुळे या बोगी फॅक्ट्रीतून नेमके कोणते बोगी निघतील हेच त्यांना माहित नाही.

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मंजूर केले होते. त्याचे काम राज्यातील महायुती सरकार करीत नाही. मराठवाडा, विदर्भ, उर्वरीत वैधानिक विकास महामंडळे महायुती, एनडीए सरकाने गुंडाळले आहेत्.ा बेकारी, शेतमालाला भाव नाही, महिला अत्याचार यामुळे मतदारांमध्ये सत्तपक्षाविरुद्ध रोष असून तो मतदानातून व्यक्त होईल. काँग्रेस महाविकास आघाडीला यश मतदारांचे आणि आघाडीच्या एकजूटीचे असणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात घरवापसी सुरु होईल, असेही माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले.

यावेळी आशाताई शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, बालाजी रेड्डी, राजा मणियार, अ‍ॅड. उदय गवारे यांनीही भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेस विद्या पाटील, श्रीदेवी औसे, गणेश एसआर देशमुख, सिकंदर पटेल, प्रविण सूूर्यवंशी, अ‍ॅड. देविदास बोरुळे, प्रा. प्रविण कांबळे, अ‍ॅड. अंगद वाघमारे यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. काळगे यांचा मोठ्या फरकाने विजय होणार
निवडणुक लागल्यापासून ते लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून उत्साहाचे वातावरण राहिले. जनतेच्या मनात जे तेच गॅरंटी कार्डमध्ये असल्याने प्रचंड प्रतिसाद मिळाला, एकच फॅक्टर काळगे डॉक्टर हे वाक्य संपूर्ण मतदार संघात लोकप्रिय झाले. डॉ. काळगे यांचे व्यक्तीमत्व मतदारांच्या पसंतीस उतरले, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यावेळी म्हणाले.

जनतेचा प्रतिसाद आमची ऊर्जा वाढविणारा ठरला
२१ मार्चपासून काँग्रेस आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता ऊर्जा घेऊन मतदारसंघात फिरला. जनतेचा प्रतिसाद आमची ऊर्जा वाढविणारा ठरला. जनता मला आशिर्वादरुपी मतदान करेल, अशी अपेक्षा, असे लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले.

भाजपाच्या विरोधात भारतीय जनता
लातूर लोकसभेची निवडणुक भाजपाच्या विरोधात भारतीय जनता अशी झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपामधील मोठी गटबाजी समोर आली. या उलट काँग्रेस महाविकास आघाडी एकसंघपणे लढली. अहमदपूर डॉ. शिवाजी काळगे यांना सर्वाधिक मताधिक्क्य देईल, असे माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR