कामकाजाबाबत तक्रार असल्यास थेट संपर्क साधावा

चाकूर : प्रतिनिधी
पंचायत समितीच्या कामकाजाबाबत कोणत्याही नागरिकास तक्रार अथवा अडचण असल्यास ती थेट माझ्याकडे नोंदवावी. प्रत्येक तक्रारीचे निष्पक्षपणे निराकरण करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम आम्ही सर्व लोकप्रतिनिधी करू, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे यांनी केले आहे.
चाकूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मागील काही दिवसांपासून पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचाराबाबत समाजमाध्यमांवर विविध आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. सभापती जयश्री नागरगोजे म्हणाल्या, पंचायत समितीबाबत होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वीच्या प्रशासक काळातील बाबींचा संबंध आमच्याशी जोडला जात आहे. पंचायत समितीच्या कामकाजात शिस्त आणण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही समस्या असल्यास सभापती, उपसभापती किंवा पंचायत समिती सदस्यांशी थेट संपर्क साधावा. त्यांच्या समस्यांचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व इतर नेत्यांवर करण्यात येणा-या आरोपांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे आरोपांचे ठोस पुरावे असतील त्यांनी ते समोर आणावेत. अन्यथा अशा बिनबुडाच्या आरोपांना कोणताही अर्थ उरत नाही. यावेळी उपसभापती भुजंग शिंदे यांनीही पंचायत समितीच्या कामकाजाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पंचायत समितीच्या प्रशासनात शिस्त आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गटविकास अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळेच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. लवकरच नवीन गटविकास अधिकारी रुजू होतील आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण केले जाईल.काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट व्यक्तींचीच बिले काढल्याचा आरोप केल्याबाबत शिंदे म्हणाले की, असा एकही लाभार्थी त्यांनी दाखवावा, ज्याचे बिल आम्ही नियमबा  पद्धतीने काढले आहे. उलट आरोप करणा-या पक्षातील कार्यकर्त्यांच्या शिफारशीनुसार अनेकांची प्रलंबित बिले अदा करण्यात आली असल्याचे उपसभापती भुजंग शिंदे यांनी शेवटी सांगीतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news