34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरकामगार विरोधी मोदी सरकारला पायउतार करा

कामगार विरोधी मोदी सरकारला पायउतार करा

लातूर : प्रतिनिधी
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या असून मोदीजींनी भाजपच्या वतीने चारशे पार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे व त्या अनुषंगाने मोदी-शाह यांनी देशभर प्रचाराचा झंजावात सुरु केला असून त्यांना सर्वत्र शेतकरी व कामगार यांचा रोष पत्कारावा लागत आहे. मोदी-शाह यांनी गेल्या दहा वर्षात भांडवलदारांचे हित जपले असून कामगारांनादेशोधडीला लावले आहे. विद्यमान सरकार अंबानी व अदानी या गुजराती उद्योजकांचे घशात देशाची साधन संपत्ती व सरकारी मालमत्ता घालीत असून कामगारांना बेदखल करण्यात आले आहे.
देशातील सुमारे दोनशे आस्थापणामधील पंचाहात्तर लाख इपीएस -९५ सेवा निवृत्त कामगारांना पर्याप्त निधी असून देखील मूलभूत गरजा भागाविणारी पेंशनवाढ नाकारली असल्यामुळे कामगारात असंतोष धुमसत आहे. सध्या या कामगारांना केवळ ५०० रुपये ते ४ हजार रुपये एवढी अत्यल्प पेंशन मिळत असून त्यात एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे उपासमार व मानसिक तणावामुळे दरवर्षी हजारो कामगार मरण पावत आहेत. पेंशनवाढ मिळावी म्हणून वयोवृद्ध कामगारांनी दिल्ली येथे अनेक आंदोलने केली.परंतू मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करुन त्यांचे रास्त मागाण्यांना केराची टोपली दाखविली आहे. एकूणच केंद्रातील विद्यमान सरकार जेष्ठ नागरिक व कामगार यांचे कल्याणाचा विचार करीत नसल्यामुळे ते कामगार विरोधी सिद्ध झाले आहे. मोदी-शाह
यांना गुजरात म्हणजेच भारत व गुजराती उद्योजक हेच देशाचे तारणहार असे समीकरण केले आहे.
महाराष्ट्रातही एक उपमुख्यमंत्री सर्वांना भारी पडत आहेत. त्यांचेकडे राज्याचे उर्जा खाते असूनही ते निवृत्त वीज कामगारांना राज्य कर्मचारी यांच्या सारखी पेन्शन सुरु करीत नाहीत. त्यामुळे सर्व सेवानिवृत्तीवर भाजपा प्रणीत घटक पक्षांना मतदान न करता काँग्रेस प्रणीत उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना मतदान करावे व कामगार विरोधी मोदी सरकारला पाय उतार करावे. असे अवाहन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस इंटक जिल्हा लातूर यांचे वतीने प्रा. के. एन. अंबाड व आर. एम. कत्ते यांनी केले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या असून मोदीजींनी भाजपच्या वतीने चारशे पार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे व त्या अनुषंगाने मोदी-शाह यांनी देशभर प्रचाराचा झंजावात सुरु केला असून त्यांना सर्वत्र शेतकरी व कामगार यांचा रोष पत्कारावा लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR