34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरसोलापूरच्या नव्या शासकीय महिला रुग्णालयात नवजात बालिकेचे स्वागत

सोलापूरच्या नव्या शासकीय महिला रुग्णालयात नवजात बालिकेचे स्वागत

सोलापूर : येथील गुरुनानक चौकातील नव्याने सुरू झालेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयात पहिली प्रसूती शस्त्रक्रिया (सिझेरियन) होऊन प्रसूत झालेल्या आई व नवजात कन्येचे स्वागत करण्यात आले. येथील गुरुनानक चौकात महिला व नवजात शिशुंसाठी नवीन शासकीय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये गरोदर मातांची तपासणी, प्रसूती, शस्त्रक्रिया व नवजात बालकांची देखभाल करण्यात येते. त्यासाठी सर्व अद्ययावत यंत्रसामग्री, शस्त्रक्रिया कक्ष नव्याने सुरु करण्यात आले आहे.

पहिली प्रसूती शस्त्रक्रिया (सिझेरियन) शरयू दीपक सुरवसे जवळगा (सिंधी, जि. लातूर) यांच्यावर करण्यात आली होती. रुग्णालयात झालेल्या प्रसूती केसमधील माता व जन्मलेल्या कन्येचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांना शासकीय वाहनातून आज सुखरूप घरी सोडले आहे.यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, वैद्यकीय, अधिक्षक जयश्री ढवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. आशा घोडके, बालरोग तज्ञ डॉ. मुकुंद माने, दंतरोग तज्ञ डॉ. वायचळ, अधिसेविका दीपाली काळे, परिसेविका शीतल ओहाळ, शुभांगी पडवळ यांच्यासह कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

महिला व नवजात शिशुंसाठी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, औषधे उपलब्ध आहेत. तज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळतात. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा.असे जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. जयश्री ढवळे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR