34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरमाळशिरस तालुक्यात पालखीमार्ग रुंदीकरणातील अनेक कामे अपूर्णावस्थेत

माळशिरस तालुक्यात पालखीमार्ग रुंदीकरणातील अनेक कामे अपूर्णावस्थेत

अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील उड्डाणपूल, सर्व्हिस रोड, नीरा नदीवरील पूल, ओढा व कॅनॉलवरील पुलांची कामे अर्धवट आहेत. ही कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शाश्वती नसल्याने यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास जुन्या मागनिच वाटचाल करावी लागण्याची दाट शक्यता आहे.

आषाढी वारीसाठी संत तुकोबांचा पालखी सोहळा २८ जूनला देहूतून प्रस्थान ठेवणार आहे. १२ जुलैला सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. नीरा नदीकरीत अकलूज जवळचा नवीन पूल ते बोंडलेपर्यंतचा नवीन मार्ग सुमारे २७ किलोमीटर आहे. माळशिरस तालुक्यात तुकोबांच्या पालखीमार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. सपाट भागात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्ण झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्याची एक बाजू पूर्ण तर दुसरी बाजू अपूर्ण अशी स्थिती आहे. या मार्गावरील नीरा नदीवरील पूल, उड्डाणपूल, ओढा व कॅनॉलवरील पूल, सर्व्हिस रोडची कामे सर्रास अपूर्ण आहेत.

पुणे व सोलापूर जिल्ह्यास जोडणान्या नीरा नदीवरील नवीन पुलाचे काम अर्धवट आहे. तेथून पुढे माळीनगर पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता झाला आहे. तथापि, माळीनगरमधील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. येथील एकाच बाजूचा सर्व्हिस रोड चालू असल्याने त्यावरूनच दुहेरी वाहतूक चालू आहे. परिणामी येथे वाहतूक कोंडी होत आहे. गट नंबर दोन येथील कॅनॉलवरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने येथील उड्डाण‌पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे येथील एकच सर्व्हिस रोड चालू आहे.

गट नंबर दोनच्या पुढे लवंग बायपासच्या रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्ण आहेत. मात्र, तेथून पुढे महाळुंगकडे जाताना असलेला उड्डाणपूल व सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यास गट नंबर दोन येथून पंचवीस चार मार्गेच जुन्या रस्त्यावरून महाळुंगकडे वाटचाल करावी लागेल, अशी सद्यः स्थिती आहे. महाळुंग गावानजीकचा, महाळुंग- श्रीपूर दरम्यानचा, श्रीपूर व माळखांबी जवळच्या उड्डाणपुलांची कामे अपूर्ण आहेत. या भागातील सपाटीवरील रस्त्यांची कामे बऱ्यापैकी पूर्ण असली तरी उड्डाणपुलांची कामे पूर्ण नसल्याने सपाट भागातील पूर्ण झालेल्या रस्त्यांचा वापर करणे अवघड आहे.

माळखांबीच्या पुढे असलेल्या उजनी कैनॉलपासून बोंडलेपर्यंतचा पाच किलोमीटरचा रस्ता अपवाद वगळता सुसाट आहे. माळीनगर व गट नंबर दोन येथील उड्डाणपुलाची कामे अपूर्ण असल्याने येथील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची कामे पालखीपूर्वी पूर्ण न झाल्यास येथून पालखी सोहळा जाताना वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता आहे. एकाच बाजूच्या सर्व्हिस रोडवरून दुहेरी वाहतूक चालू असल्याने अपघात होत आहेत.उड्डाणपुलांच्या अर्धवट कामांमुळे पालखी सोहळा जुन्या रस्त्यावरून जाणार हे उघड आहे. लवंग बायपास ते पंचवीस चार व तेथून पुढे महाळुंगपर्यंत तसेच माळखांबी भागात जुन्या पालखीमार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले दिसत आहेत. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. देहू संस्थानमार्फत पाच-सहा दिवसांत पालखीमार्गाचा पाहणी दौरा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे पालखी सोह‌ळा प्रमुख संतोष मोरे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR