किनवट तालुक्यात अपघात, ४ ठार

६ जण गंभीर जखमी, सर्व भाविक तेलंगणातील
नांदेड : प्रतिनिधी
मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणा-या भाविकांच्या कमांडर जीपला किनवट तालुक्यात भीषण अपघात झाला. तोटंबा घाटात भरधाव जीप रस्त्यालगतच्या झाडावर आदळून चौघांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

श्रावण मासानिमित्त तेलंगणातील कुबीर मंडळातील पारडी (बी) येथील रहिवासी असलेले १० ते १२ भाविक नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते सायंकाळी कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत असताना तोटंबा घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी जीप (क्र. एपी २५ एएच ६७४७) रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि या भीषण दुर्घटनेत ३ भाविकांचा जागीच तर चालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तुम सायलू (६०), तुम गौराबाई (६०), आवला गंगाधर (५५, रा. पार्डी, ता. कुबेर, जि. निर्मल, तेलंगणा) यांच्यासह चौघांचा समावेश आहे. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी म्हैसा येथे हलविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी वाहनाने तेलंगणातील म्हैसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या दुर्घटनेने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news