काँग्रेस टीव्हीके सरकारमधून बाहेर पडणार?

चेन्नई : आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून तमिळगा वेत्री कळगम(टीव्हीके) या मित्रपक्षाने मान्यता दिली नाही, तर काँग्रेसचे दोन्ही मंत्री तमिळनाडू मंत्रिमंडळातून राजीनामा देतील, असा स्पष्ट इशारा पर्यटन मंत्री एस. राजेश कुमार यांनी दिला आहे. राहुल गांधी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असा ठाम दावाही त्यांनी केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना टीव्हीके पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंत्री राजेश कुमार यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. जर टीव्हीकेने पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या पाठीशी राहण्यास नकार दिला, तर ते आणि त्यांचे सहकारी पी. विश्वनाथन आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे राजेश कुमार यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाने विजय मिळवला होता.

मे महिन्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाले आणि विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसलाही स्थान देण्यात आले. मात्र आता पंतप्रधानपदाच्या मुद्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आणि त्यांच्या जनता व तरुणांविरोधातील धोरणांविरुद्धच्या अथक लढ्यामुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता समाजातील सर्व स्तरांमध्ये वाढत आहे. देशभरातील मतदारांनी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारले आहे, असेही राजेश कुमार यावेळी म्हणाले. तसेच काँग्रेस पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, असा थेट इशारा दिला.

ते कन्याकुमारी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, विजय सरकारमधील दुसरे मंत्री पी. विश्वनाथन यांच्याशी या संदर्भात संपर्क होऊ शकला नसला. मात्र राजेश कुमार यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील सत्ताधारी आघाडीत तणाव निर्माण होण्याची आणि मतभेद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news