37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रखडसेंना पक्षात येण्यास विरोध नाही : बावनकुळे

खडसेंना पक्षात येण्यास विरोध नाही : बावनकुळे

पुणे -पक्षातून बाहेर पडलेले आणि पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक असणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पक्षात येण्यास कोणाचाही विरोध नाही. पण याबाबतचा निर्णय पक्षाची केंद्रीय आणि राज्यस्तरीय समिती घेणारं आहे असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पक्षात येण्यास कोणालाही नाही म्हणत नाही. जे पक्षात येतील त्यांचा पक्ष वाढीसाठी नक्कीच उपयोग होणारआहे.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणखी विकसित करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असायला हवा.

पक्ष प्रवेशाबाबत दोन्ही समित्या व्यापक विचार करुन निर्णय घेतील.तात्पुरता निर्णय अथवा तुटक निर्णय घेतला जाणार नाही.तसेच त्यांच्या प्रवेशाला कोणाचा विरोध नाही.असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत जवळपास अंतिम निर्णय झाला आहे. याबाबत एकमत झाले आहे.अजून एक बैठक होणार आहे त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.तसेच सातारा येथील जागेबाबत निर्णय झाला आहे अशी माहिती त्यांनी सांगितली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR