लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या श्री उत्तरादी मठ येथे बुधवारी सायंकाळी गुरू पौर्णिमा निमित्त गुरुजींचे पूजन करण्यात आले. यावेळी पंडित रघुत्तमआचार्य जोशी, पंडित राम कृष्णाचार्य जोशी हलगरकर, पंडित श्रीपाद आचार्य हलगरकर यांचे प्रवचन संपन्न झाले. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा प्राप्त होणारे नाही मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ असून जीवाने भक्ताने उठताना बसताना सर्व कार्य करीत असताना स्रानाच्या वेळी भोजन करीत असताना गुरुस्मरण करणे म्हणजेच जीवनाचे खरे साफल्य आहे. त्यामुळे गुरूंची सेवा हीच श्रेष्ठ सेवा असून त्यासाठी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आचार्य यांनी प्रवचनातून व्यक्त केले.
यावेळी जगद्गुरु श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज यांच्या पादुकाचे पूजन व लातूरच्या उत्तरा दिमठाचे प्रमुख मराठवाडा प्रचार प्रमुख वै.पंडित वामन आचार्य जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कृष्णा महाराज सुहास गडीकर, पत्रकार हरीराम कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, भानुदास भातंबरेकर, देशमुख, नारायण संधीकर, देशपांडे, अंबादास पत्की गजानन सबनीस, वसंतराव हत्तरगेकर, वसंतराव बेंडे, सुरेशराव कवठाळकर तळीखेडे, वेदव्यास जोशी, सुहास महाराज, कुलकर्णी औरादकर, शुभम बोरगावकर, सचिन दिवाण नारायण बोरगावकर धनंजय बोरगावकर, लक्ष्मीकांत काळे तोडीवाले, कृष्णा कडपुरकर, मनोज धोंडदेव, उपाध्ये नरेंद्र वैद्यचैतन्य दिवाण यांच्यासह महिला, पुरूष उत्तरादिमठ येथील शिष्य, भक्त गण उपस्थित होते.
















