लातूर : प्रतिनिधी
प्रशासक कालावधीत लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांना लागलेल्या सवयी अद्याप सुधारल्या गेल्या नाहित. लातूर जिल्हा परिषदेत प्रशासक राज जाऊन पदाधिका-यांनी हातात कारभार घेतल्यानंतर कर्मचा-यांच्या अनेक बाबी उघड होत आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांनी बुधवारी सकाळी १० वाजता किती कर्मचारी आपल्या टेबलवर कार्यरत आहेत. या संदर्भाने तपासणी केली असता तब्बल ८१ म्हणजेच २६.४७ टक्के कर्मचारी आपल्या कामाच्या टेबलवर पोहचलेच नसल्याचे दिसून आले. या कर्मचा-यांना जिल्हा परिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे उशिरा कार्यालयात येणा-या कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहे.
लातूर जिल्हा जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार यांनी जि. प. प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांना सोबत घेऊन बुधवारी सकाळी १० वाजता किती कर्मचारी जिल्हा परिषदेत येतात या संदर्भाने पाहणी सुरू केली. यात १५ विभागांच्या तपासणीत ८१ कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. सदर कार्यालयातील स्वाक्षरीचे रजिस्टर प्रशासनाने ताब्यात घेतल्याने उनुपस्थित कर्मचा-यांचे धाबे दणाणले. यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती बिरादार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला उशिरा आलेल्या कर्मचा-यांची आर्ध्या दिवसाचा पगार कपात करावा, अशी सुचना केली आहे.
लातूर जिल्हा परिषदेत गेल्या चार वर्षानंतर प्रशासक राज संपून मार्च पासून पदाधिकारी जिल्हा परिषदेचा कारभार हाकत आहेत. कर्मचा-यांना प्रशासक काळात जी मोकळीक होती. त्याची सवय अद्याप दूर होताना दिसून येत नाही. जिल्हा परिषदेत कांही दिवसापूर्वी उशिरा येणा-या कर्मचा-यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही केली होती. मात्र त्यात
जनतेची कामे वेळेवर व्हावीत, हा उद्देश
लातूर जिल्हा परिषदेत सकाळी आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांना सोबत घेऊन किती कर्मचारी कामावर वेळेत येतात याची पाहणी केली. यात विभाग प्रमुख व अनेक कर्मचारी आपल्या टेबलवर दिसून आले नाहीत. या उशिरा येणा-या कर्मचा-यांचा दिवसाचा आर्धा पगार कपात करावा, अशी सुचना प्रशासनाला केली आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरीक कामाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेला येतात. कर्मचारी जर कामाला वेळेवर येत नसतील तर कामे वेळेवर कशी होणार, जनतेची कामे वेळेवर व्हावीत हा या पाहणी मागचा उद्देश आसल्याचे आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार यांनी सांगीतले.
१५ पैकी १३ विभाग प्रमुखांनीही नाही पाळली वेळ
लातूर जिल्हा परिषदेतील १५ विभागात ३०६ कर्मचारी कार्यरत आहेत. विभाग प्रमुख जर कार्यालयात वेळेवर येणार नसतील तर त्यांच्या आधिनस्त कर्मचारीही आपल्या सोयीनुसार कार्यायात येतात हे बुधवारी आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार व उपमुख्यकार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांनी केलेल्या कर्मचारी उपस्थितीच्या पाहणी दरम्यान समोर आले आहे. पंचायत विभाग व सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख सोडले तरी इतर १३ विभागाचे प्रमुख अनुपस्थित होते. यात दंडात्मक कारवाई मात्र कर्मचा-यांवर होते. विभाग प्रमुखांनाही वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. या संदर्भाने प्रशासन ठोस कार्यवाही करणार का अशी चर्चा होत आहे.
फारसा फरक पडलेला दिसून आला नाही.
















