गेल्या ३१,६२८ कोटींच्या पॅकेजचे काय झाले?; मुख्यमंत्री दुष्काळ दौ-यावर असतानाच विजय वडेट्टीवार यांनी घेरले

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला भेट देत आहेत. दुष्काळाची भीषणता, दाहकता त्यांनी पाहिली. सरकार शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी या दौ-यात जाहीर केले. त्याचवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पॅकेजवरून मुख्यमंर्त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मागच्या ३१,६२८ कोटींच्या पॅकेजचे काय झाले? असा थेट सवाल त्यांनी फडणवीस यांना विचारला. ओला दुष्काळाचे पैसे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत उर्वरीत शेतक-यांना अद्याप लाभ न मिळाल्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेजची घोषणा केली होती. ३१,६२८ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यातील २५३तालुक्यातील ६८.६९ लाख हेक्टर जमीन बाधित झाली होती. मोठे नुकसान झाले होते. शेतक-यांच्या हातातून पिके गेली होती.

३१,६२८ कोटींच्या पॅकेजमधून सरकारने केवळ ९९ लाख रुपये दिले. गेल्या पॅकेजमध्ये सरकारने केवळ १५,६६१ कोटी रुपये खर्च झाला. म्हणजे इतकी मोठी घोषणा करून निम्मेच पैसे शेतक-यांच्या पदरात पडले. म्हणजे तुम्ही पॅकेजची घोषणा करणार, पण ते शेतक-यांच्या खात्यात, हातात गेले पाहिजेत ना, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

किमान ५० हजारांची मदत द्या
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ पाहणी दौरा करणार, फिरून येणार. पण शेतक-यांना तुम्ही काय देणार आहात. त्यांच्या डोळ्यांम अश्रू आहेत. ते पुसण्याचे काम सरकारने केले पाहिजे. ५० हजारांची किमान मदत केली पाहिजे. रोजगार हमीची कामं सुरू केली पाहिजेत. सर्व प्रकारचे कर्ज कर्ज माफ व्हावं. पीक कर्ज असेल वा इतर कर्ज माफ करा. शेतात काही पिकणारच नसेल तर शेतकरी कुठून भरपाई करणार. तातडीने पंचनामे करा. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन मदत पैकेजची घोषणा करा विजय वडेट्टीवार यांची मागणी कर्जातून शेतक-यांना मुक्त करावे. दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणाही पोकळ निघाली. कोणताही शेतकरी कर्जातून मुक्त झाला नाही. शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. त्याचा सातबारा अजून कोरा झाला नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
वाढवण बंदर प्रकल्पावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या प्रकल्पासाठी सरकारने साडेतेवीस हजार कोटींची निविदा काढली. हे बंदर सरकारने अदाणीला दिला. म्हणजे मालकी अदाणींची आणि सरकारच्या तिजोरीतून त्यासाठी पैसा दिला जाणार असा आरोप त्यांनी केला. हे पैसे शेतक-यांना द्या. शक्तिपीठ महामार्गाची काय गरज आहे. हा पैसा शेतक-यांकडे वळला तर दुष्काळावर मात करता येईल असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news