गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होते

सांगली : प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी असा खळबळजनक दावा केला होता की, गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानावर माध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी दुजोरा देत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जानकर म्हणाले, त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांचे काँग्रेसबरोबर बोलणे चालू होते. ते भाजपच्या जाचाला कंटाळले होते आणि त्यांची पक्षात घुसमट होत चालली होती, हे सत्य आहे. त्यांची भाजपवर मोठी नाराजी होती.

मुंडे साहेब खरोखरच जाणार होते की नाही, याबद्दल मी १०० टक्के सांगू शकत नाही. कारण सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही आणि मी त्या मीटिंगलाही नव्हतो. पण साहेब परेशान होते, हे नक्की.

चव्हाणांच्या विधानावर मत मांडताना जानकर म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे एक चांगले नेते आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. पण गोपीनाथ मुंडे आता हयात नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती दिवंगत झाल्यानंतर त्यांच्यावर आता चर्चा किंवा डायलॉग करणे हे मला व्यक्तिगतरीत्या योग्य वाटत नाही.

जानकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणीही शेअर केल्या. त्यावेळी साहेबांचे आणि माझे संबंध एवढे जवळचे नव्हते. पण मुंडे साहेब मला पितृतुल्य होते, त्यांनी मला मुलासारखेच मानले होते. त्यामुळे मला त्यांचा आदरच आहे.

आता जर-तरच्या गोष्टींवर मला अधिक काही सांगता येणार नाही, असेही जानकर यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता थेट महादेव जानकर यांनीच ‘मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते’ असे विधान केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणि भाजप-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तापण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news