ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवकास धरले धारेवर

औसा : प्रतिनिधी
औसा  तालुक्यातील बोरफळ  ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या फुलवंती लावणी सांस्कृतिक कला केंद्रास ग्रामस्थांना कसलीही माहिती न देता ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे देण्यात आलेल्या नाहरकत पत्राला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आणि हे नाहरकत पत्र तात्काळ रद्द करावे म्हणून सरपंच व ग्रामसेवकास धारेवर धरीत आक्रमक पवित्रा घेतला.
१ मे २०२६ रोजी झालेल्या बोरफळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील रहिवासी संतÞोष मोहन पवार यांना बोरफळ येथील गट क्रमांक १४५ मध्ये फुलवंती लावणी सांस्कृतिक कला केंद्र चालू करण्यास ठराव क्रमांक ५ नुसार नाहरकत पत्र दिले होते. परंतु हा ठराव प्रत्यक्ष ग्रामसभेत मांडण्यात आला नव्हता.असा कोणताही ठराव आलेला नसताना ग्रामस्थांना अंधारात ठेवून सरपंच व ग्रामसेवक यांनी हा ठराव लिहून घेतला व ग्रामस्थांचा विश्वासघात केला. सदरील लावणी सांस्कृतिक कला केंद्राचे नाहरकत पत्र रद्द करण्यासाठी औसा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख जयश्री उटगे यांनी बोरफळ येथील महिलांना जागृत केले. बोरफळ गावातील ग्रामस्थांनी जयश्री उटगे यांच्या सोबतीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन फुलवंती लावणी कला केंद्राचे नाहरकत पत्र रद्द करण्यासाठी निवेदन व तक्रार दिली.
या तक्रारीची दखल घेत बोरफळ ग्रामपंचायतने फुलवंती लावणी कला केंद्राचे नाहरकत पत्र रद्द करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात ९ जुलै  २०२६ रोजी दिले आहे. मात्र, ग्रामस्थांचा विश्वासघात करुन ग्रामसभेच्या खोट्या ठरावाचा आधार घेऊन बोरफळ शिवारात फुलवंती लावणी सांस्कृतिक कला केंद्रास  दिलेल्या नाहरकत पत्राबाबत तातडीने ग्रामसभा बोलावून नाहरकत पत्र रद्द केल्याचे जाहीर करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याच अनुषंगाने कला केंद्रास नाहरकतसह अन्य काही विषयावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक सीताराम राठोड यांनी विषय वाचायला सुरुवात करताच अगोदर कला केंद्रास नाहरकत कुण्या आधारे दिले, ते सांगा यावर ग्रामसेवक यांनी तीन महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेची मंजुरी असल्याचे सांगितले आणि त्या आधारे हे नाहरकत दिल्याचे उत्तर दिले. या ठरवावर किती लोकांच्या सह्या आहेत, याची कल्पना उपसरपंच व सदस्यांना आहे का, अशी विचारणा केली. यावर सर्व सदस्य व उपसरपंच यांनी असा कुठलाच ठराव झाला नाही आणि असणारही नाही, असे सांगितले. लगेच यावर किती ग्रामस्थांनी सह्या केल्या, त्यांची नावे वाचून दाखवा म्हणून ग्रामसेवकास सांगितले.
त्यावेळी ग्रामसेवकांनी नावे वाचण्यास सुरुवात केली आणि यात या गावातील नावे वाचण्यात आली. यातील अनेकांनी आपण सह्या केल्या नाहीत, त्या बनावट व खोट्या सह्या आहेत, असे म्हटले आणि ग्रामसेवक व सरपंच यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. एवढेच नव्हे तर सरपंच, सदस्यांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली. यावरून वाद चांगलाच पेटला असून, ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news