26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरग्रामीण भागातील गुणवत्ता कौतुकास पात्र ठरणारी

ग्रामीण भागातील गुणवत्ता कौतुकास पात्र ठरणारी

औसा : प्रतिनिधी
हसेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत संस्थेतील विद्यार्थ्यांनी कला क्रीडा शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात अल्पावधीतच यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास पात्र ठरणारी आहे असे प्रतिक्रिया सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
श्री वेताळेश्वर शक्षिण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात युवा रंग २०२४ वार्षिक स्रेह संमेलन पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्य. अध्यक्षस्थानी धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश ंिनंबाळकर हे होते.  मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सरचिटणीस बबन भोसले,
ओबीसीचे जिल्हाध्यक्ष सुधीर पोतदार, व्यवस्थापक समिती सदस्य रमाकांत घाटगे, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरप्पा बावगे, उपाध्यक्षा जयदेवी बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवंिलग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, संचालिका माधुरी बावगे, सीमा बावगे, प्राचार्या चंद्रप्रभू जंगमे, प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे),हे उपस्थित होते. प्रास्ताविकपर सचिव वेताळेश्वर बावगे यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम,प्राचार्या योगिता मेदगे, प्राचार्य  संतोष मेदगे, मुख्याध्यापक कालिदास गोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आयेशा पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन  शिवंिलग जेवळे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR