चाकूर: अ. ना. शिंदे
तालुक्यातील जनावरांचा चारा आणि पाण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासन जनावरांसाठी छावण्या कधी सुरु करणार याची वाट पशुधन मालक पाहत आहेत. प्रामुख्याने तालुक्यात असलेला चारा जनावरांसाठी उपयुक्त असल्याने शेतक-यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
सध्या तरी तालुक्यात कोठेही जनावरांना छावणी सुरू झालेली नाहीत. त्यामुळे या तालुक्यातील पशुपालक पशुधनाची चारा आणि पाणी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने हा चारा कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या तालुक्यात पशुधन किती आहे यावर चारा आणि पाण्याची व्यवस्थेचे नियोजन करावे लागणार आहे. संबंधित गावातील जनावरे किती आहेत यानुसार याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती शासकिय यंत्रणा देत आहे. गावपातळीवरील पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या बाबीचे नियोजन करीत असून पशुसंवर्धन विभाग कामाला लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पशुपालक शेतकरी या चारा छावण्या आणि पाण्याची व्यवस्था संबंधित यंत्रणा कधी करणार याची वाट पाहत आहेत.















