40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरचिंचोली (ब.) येथे पाण्यासाठी ठिय्या

चिंचोली (ब.) येथे पाण्यासाठी ठिय्या

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजेचिंचोली ब येथे पाण्याची भीषण टंचाई असून दहा हजार लोकसंख्येचे गाव असताना प्रशासनाने एकच टँकर गावांमध्ये दिले असून ते अपुरे आहे. महिला, वृद्ध, लहान मुले  यांना उन्हाचा पारा वाढला असतानाही भर उन्हात पाण्यासाठी भटकंती  करावी लागत आहे. याकडे वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या दुर्लक्षामुळे सदस्यांसह नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. चिंचोली (ब) येथे तीव्र पाणीटंचाई असताना सुद्धा चार महिने झाले ग्रामपंचायतची मासिक बैठक झालेली नाही. जानेवारी महिन्यातील ग्रामसभा अद्यापही झालेली नाही. ग्रामपंचायतने अंगणवाडीचे साहित्य खरेदी न करताच पैसे उचलेले आहेत असाही आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी  केला.
अपंग बांधव त्यांच्या अंपंग निधीची वारंवार मागणी करूनही त्यांना त्यांच्या हक्काचा निधी मिळत नाही. चार महिन्यांपासून जागेचे फेर ग्रामसेवक, मासिक बैठकआभावी धुळ घात पडले आहेत. अशा विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर ठिय्या मांडला. ग्रामसेवक यांना या ठिया आंदोलनाची माहिती देऊनही प्रशासन कोणताही कर्मचारी अथवा सरपंच निवेदन स्वीकारण्याठी उपस्थित नव्हते.
शेवटी मागण्यांचे निवेदन सरपंच सौ. रेखा पाटील यांचे प्रतिनिधी  म्हणून ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांनी स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार सुरवसे, इंद्रजीत नवले, वृश्चिक पाटील, बाबासाहेब घनमारे, गोंिवद नांदे, रावसाहेब जाधव, विश्वास कावळे, संभाजी भडंगे, सुनिल गुंड, अभिजीत भालेकर, सुरज कावळे, पवन भडंगे, दशरथ माळी, आनंत कणसे, भैरवनाथ बरबडे, मनोज कुलकर्णी आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR