40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाआरसीबीचे पंजाबसमोर २४२ धावांचे आव्हान

आरसीबीचे पंजाबसमोर २४२ धावांचे आव्हान

धर्मशाला : रनमशीन विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात २४१ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने ९२ तर पाटीदार याने ५५ धावांची खेळी केली. त्याशिवाय कॅमरुन ग्रीन याने ४६ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून हर्षल पटेल यानं तीन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाठी २४२ धावांचे आव्हान मिळाले आहे.

पंजाबचा कर्णधार सॅम करन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धर्मशालाच्या मैदानावर आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार फॅफ डु प्लेसिस आणि विल जॅक्स स्वस्तात तंबूत परतले. पंजाबकडून पदार्पण करणा-या विद्वात कवेरप्पा याने आरसीबीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. त्याने फाफ डु प्लेलिस आणि विल जॅक्स यांना स्वस्तात तंबूत परतले. फाफ डु प्लेलिस याने ७ चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या. तर विल जॅक्स याने सात चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२ धावा केल्या. एकीकडे विकेट पडत असताना दुस-या बाजूला विराट कोहली खंबीरपणे फलंदाजी करत राहिला आहे.

विराट कोहलीने रजत पाटीदारच्या साथीने आरसीबीच्या डावाला आकार दिला. दोघांनी ३२ चेंडूमध्ये ७६ धावांची झंझावती भागिदारी केली. पाटीदार बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याच्यासोबत ४६ चेंडूमध्ये ९२ धावांची भागिदारी केली. विराट कोहलीच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने मोठी धावसंख्या उभारली. रजत पाटीदार याने आरसीबीच्या धावसंख्येला वेग दिला. पाटीदार याने फक्त २३ चेंडूमध्ये ५५ धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये रजत पाटीदारने सहा खणखणीत षटकार ठोकले, तर तीन चौकार लगावले. रजत पाटीदारने २४० च्या नटरनेटने धावांचा पाऊस पाडला.

विराट कोहलीचे शतक हुकले
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा संभाळला. कॅमरुन ग्रीनसोबत कोहलीने डावाला आकार दिला. विराट कोहलीने वादळी ९२ धावांची खेळी केली. त्याचे शतक फक्त ८ धावांनी हुकले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने १९६ च्या स्ट्राईक रेटने ४७ चेंडूमध्ये ९२ धावांची खेळी केली. रनमशीन विराट कोहलीने सहा षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR