36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाबजरंग पुनिया निलंबित

बजरंग पुनिया निलंबित

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया याला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) तात्पुरते निलंबित केले आहे. बजरंग पुनियाने डोप चाचणीसाठी आपला नमुना दिला नाही, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मार्चमध्ये सोनीपत येथे झालेल्या राष्ट्रीय चाचण्यांदरम्यान बजरंग पुनियाने डोप चाचणीसाठी नमुने देण्यास नकार दिला होता.

बजरंग पुनियावरील बंदी नाडाने उठवली नाही तर पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम चाचण्यांमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही. या वर्षी २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन फ्रान्समध्ये होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग पुनियाने सोनीपत येथे झालेल्या ट्रायल दरम्यान लघवीचा नमुना सादर केला नाही. दरम्यान, काही काळापूर्वी बजरंग पुनियाने एक व्हीडीओ जारी केला होता. या व्हीडीओमध्ये बजरंग पुनियाने डोप कलेक्शन किटची मुदत संपल्याबद्दल सांगितले होते. या कारणामुळे त्याने लघवीचा नमुना देण्यास नकार दिला असा दावा करण्यात आला आहे. यासोबतच बजरंगने आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोपही केला आहे. ‘नाडा’चे अधिकारी त्याचे नमुने गोळा करण्यासाठी कालबा उपकरणे वापरतात, असा आरोपही बजरंगने केला आहे.

‘नाडा’ने निवेदन जारी करून केले निलंबित

दरम्यान, नॅशनल एंट्री डोपिंग एजन्सी (नाडा) ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, नाडा २०२१ च्या कलम ७.४ नुसार, बजरंग पुनियाला तात्काळ प्रभावाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या खटल्याच्या सुनावणीत अंतिम निर्णय होण्यापूर्वी बजरंग पुनियाला कोणत्याही स्पर्धा किंवा चाचण्यांमध्ये भाग घेण्यास तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR