परभणी : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री १२.१५ वाजता दादा शरीफ चौक जिंतूर येथे कारवाई केली. या कारवाईत बोलेरो गाडी एमएच २९ बीसी ३२५६ हिची तपासणी केली असता त्यात ६४ हजार ८०० रुपयांचा के.एन.वन जाफरानी जर्दाचे ६७५ पॉकेट आढळले. याशिवाय १ लाख १ हजार २५० रुपयांचा सुगंधित पान मसालाचे ६७५ पॉकेट जप्त करण्यात या कारवाईत बोलेरा गाडी ६ लाख रुपये असा एकुण ७ लाख ६६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ९ जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी स्थागुशा परभणी पोह. सिद्धेश्वर चाटे (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात आरोपी सय्यद वसीम सय्यद मोसिन (रा. जमदार गल्ली जिंतूर) हा अग्रवाल रा. हिंगोली, सचिन देशमुख रा. खरी प्लॉट जिंतूर, सय्यद अवेस सय्यद चिनू रा. साबुन वेस जिंतूर, फजल खान खलील खान पठाण रा. पठाण मोहला जिंतूर, जफर खान खालील खान पठाण रा. पठाण मोहल्ला जिंतूर, शेख मकसूद शेख चांद राहणार ईदगाह परिसर जिंतूर, शिवा हळदे रा. जिंतूर, बोलेरो गाडी मालक राहणार जिंतूर यांच्यासाळ प्रतीबंधीत तंबाखुजन्य पदार्थांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जिंतूर येथे बोलेरो गाडीमध्ये आढळून आला.
ही कारवाई स्थागुशा पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलिस उपनिरीक्षक सवंडकर, पोलिस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डूबे, अनिल राठोड, महेश कवठाळे, सूर्यकांत सातपुते, राम पोळ, चौरे यांच्या पथकाने केली.
















