जळकोट तालुक्यातील दोन्ही मंडळांमध्ये अतिवृष्टी

जळकोट : प्रतिनिधी
तालुक्यात ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दिवसभर झालेल्या दमदार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता सध्या तरी दूर झाली आहे.
महसूल विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जळकोट मंडळात ७५ मिमी, तर घोणसी मंडळात ७२ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील एकूण पर्जन्यमान १४७ मिमी असून सरासरी पर्जन्यमान ७३.५ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे तलाव, शेततळी आणि लघु प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. याचा फायदा पिण्याच्या पाणीपुरवठ्यासह शेतीलाही होणार असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक गावांतील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे .  जळकोट तालुक्यामध्ये जून महिन्यात चांगला पाऊस झाला होता एकाच दिवशी झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातील अनेक साठवण तलाव ९० टक्के भरले होते तर काही साठवण तलावामध्ये ५० टक्के पाणी साठा जमा झाला होता. आता ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणखीन साठवण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे.
जळकोट तालुक्यात अल निनोचा प्रभाव जाणवेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र सद्यस्थितीत जळकोट तालुका तसेच परिसरामध्ये दमदार पाऊस पडत आहे . यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच कोरडे पडलेले जलस्त्रोत पुन्हा भरू लागलेले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45

Latest news