रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विनम्र अभिवादन करण्यात आहे. यावेळी मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व लोकजागृतीच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. केवळ दीड दिवस शालेय शिक्षणाची संधी मिळूनही त्यांनी आपल्या जिद्द, अनुभवसंपन्न जीवन आणि असामान्य प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या साहित्याने वंचित, शोषित समाजाला आवाज दिला असून आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला दिशा देणारी आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचे स्मरण करताना, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या त्यांच्या ऐतिहासिक घोषणेने भारतीय स्वातंर्त्यलढ्यास नवी ऊर्जा दिली, असे विचार मांडले. यावेळी जिल्हा परिषदेच्या गटनेत्या तथा जि. प. सदस्या आशाताई भिसे, रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद कापसे, शहराध्यक्ष नितीन मोटेगावकर, बाजार समितीचे चेअरमन उमाकांत खलंग्रे, नगरसेवक सचिन मोटेगावकर, रुपेश चक्रे, विठ्ठल कटके, कृउबा संचालक प्रकाश सूर्यवंशी, हनमंत पवार, गोविंद कुडके, किशोर चक्रे, शमशोद्दीन शेख, शिवाजी अकनगीरे, सचिन इगे, चंद्रकांत कातळे, उपसरपंच प्रदीप काळे, नागेश राजे, विक्रांत पाटील, अजय चक्रे, रहीम पठाण, विनोद खंदाडे, भानुदास कुडके, संजय विरुळे, दिग्विजय पाटील, भीमाशंकर कोरे, अमरिश भिसे, संदीपान देशमुख, अमोल बंडे, बाळू पटनुरे, देवानंद कुंटेवाड, शहाजी कुरे, जगन्नाथ गाडे, शिवाजी रनदिवे, नाना व्यवहारे, माऊली सातपुते, सोपान सातपुते, विलास राठोड, माऊली कुडके, बाळू पाटील, सुशांत वंगाटे, शेषेराव ठोंबरे, सुरेंद्र शिंदे, राज मस्के, अमोल शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















