जळकोट तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस

जळकोट :  प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात सलग तिस-या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान नद्या, नाले व ओढ्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून सखल भागातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस आणखी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
घोंणशी मंडळात मागील दोन दिवसांत ९० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून आणखी पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी जळकोट मंडळातही दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक लहान कालवे व नद्यांना पाणी आले आहे. सततच्या पावसामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषत: नदीपात्रालगतच्या भागात राहणा-या नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तहसीलदार राजेश लांडगे यांनी बेळसांगवी, चिंचोली, तिरुका, मरसांगवी आणि गव्हाण येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीला पूर आल्यास नदीपात्राजवळ जाणे टाळावे, नदीत उतरण्याचा प्रयत्न करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रशासनाकडून महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news