लातूर : प्रतिनिधी
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. तोडासाही पाऊस पडला की, या चौकातील स्वामी विवेकानंद चौकाकडून या चौकात येणा-या रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्यामुळे ये-जा करणा-यांना त्रास सहन करावा लागत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना आणि वाहनधाराकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते. या परिसरात दोन ते तीन शाळा आहेत, त्यामुळे शेकडो विध्यार्थी याच रस्त्यावरून दररोज ये-जा करतात. या पाण्यातून वाहने जोरात गेल्यानंतर अनेकदा नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर हे साचलेलं पाणी उडते. त्यामुळे नागरिकांना आणि विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या आजची नसून गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासूनची हीच समस्या आहे. अनेकवेळा सामाजिक कारकर्ते आणि नागरिकांनी पाण्यात बसून आणि वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने केली. मात्र ही समस्या अजूनही मनपाकडून सोडवता आली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
















