36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद

जळकोट तालुक्यात दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद

डोंगर कोनाळीत सकाळी दहा वाजता मतदान सुरू

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे रोजी सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली . काही मतदारांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला परंतु जळकोट तालुक्यातील डोंगर कोंनाळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेल्या , मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बिघडले , कितीही प्रयत्न केले तरी हे मतदान यंत्र लवकर सुरू होऊ शकले नाही . सकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हे मतदान यंत्र सुरू होऊ शकले नाही .

तब्बल तीन तासानंतर म्हणजेच दहा वाजता मतदान यंत्र सुरू झाले व गावातील नागरिक हे मतदानासाठी पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर दाखल झाले . मतदान यंत्रामध्ये थोडासा बिगड होता यामुळे यंत्र सुरू होण्यास तब्बल तीन तासाचा वेळ लागला . मतदान यंत्र उशिरा सुरू झाल्यामुळे मतदानात देखील वेळ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान ही माहिती मिळताच जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी डोंगर कोणाळी येथील मतदान केंद्राला भेट दिली व या ठिकाणचा आढावा घेतला .

या ठिकाणचे मतदान यंत्र तीन तास बंद झाल्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली यासोबतच जळकोट शहरातील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला होता अर्ध्या तासानंतर पुन्हा हे मतदान यंत्र सुरू झाले या ठिकाणी देखील मतदार एक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते परंतु मतदान यंत्र बंद पडल्यामुळे त्यांना परत जावे लागले . या ठिकाणी देखील तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी भेट दिली .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR