36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरलोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने ,उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : आमदार धिरज देशमुख

लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने ,उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : आमदार धिरज देशमुख

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्यासह विलास सह. कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, सिने अभिनेते रितेश देशमुख, सिने अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख, चित्रपटनिर्मात्या दीपशिखा धिरज देशमुख यांनी आज सकाळी ८.३० च्या सुमारास बाभळगाव येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या प्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख म्हणाले, देशाची लोकशाही महत्वाची आहे, ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे, आपण सर्वांनीही मोठ्या संख्येने मतदान करावे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी या उत्सवात उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे, आवाहन केले. तसेच  वृद्धांना मतदानासाठी आणावे. नवमतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान करावे. आपल्या हिताचे सरकार, प्रतिनिधी निवडून आपला मतदानाचा हक्क बळकट करावा, मजबूत करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्वाचा : अभिनेते रितेश देशमुख
रितेश देशमुख म्हणाले, मी मुंबईहून मतदानासाठी लातूरला आलो आहे. मतदारांनीही घराच्या बाहेर पडून आपले कुटुंबिय, मित्र परिवारासह मोठ्या प्रमाणात मतदान करावे. जे वृद्ध, निराधार घराच्या बाहेर पडू शकत नाहीत,
त्यांनाही तरुणांनी मतदान केंद्रावर घेऊन जावून मतदान करवून घ्यावे. लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. बाहेर ऊन आहे, त्यामुळे काळजी घेत मतदानासाठी बाहेर पडावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्या एका मतामुळे बराच फरक पडतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR