जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथे नगरपंचायतीच्या विशेष समिती सभापतीची निवड करण्यासाठी तहसीलदार तथा पीठासन अधिकारी राजेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी रोहित आरबोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि २४ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपद हे नगराध्यक्ष प्रभावती कांबळे यांच्याकडेच असणार आहे. यासोबतच नियोजन व विकास समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष मन्मथ किडे यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी श्रीमती संगीता धुळशेटे, पाणीपुरवठा व जलनिसारण समिती सभापतीपदी संदीप डांगे, सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी गोपाळकृष्ण गबाळे, शालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी शिवलिंग धूळशेटे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. लक्ष्मीबाई मंगनाळे तर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी डॉ. वर्षा सचिन सिद्धेश्वरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या वेळी प्रत्येक विषय समिती सभापती पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे पिठासन अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांनी विविध विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले .
या निवडी प्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक धोंडूतात्या पाटील, सुरेखा गवळे, विनायक डांगे, बाबू मिया लाटवाले, अश्विनी महेश धुळशेट्टे, सौ. देशमुख आदी नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त विविध विषय समिती सभापतींचे अभिनंदन करण्यात आले जळकोट नगरपंचायत विषयी समित्यांच्या सभापतीची या पंचवार्षिक निवडणुकीची ही शेवटची निवड असणार आहे.

