27.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरजाऊ येथील निवासी शाळा निलंगा तालुक्यात प्रथम

जाऊ येथील निवासी शाळा निलंगा तालुक्यात प्रथम

निलंगा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुक्यातील जाऊ येथील अनुसूचित जाती व जमाती मुलींची शासकीय निवासी शाळा जाऊ तालुक्यात प्रथम आल्याने तीन लाख रुपयेचे बक्षीस तर भुतमुगळी येथील जल्हिा परिषद प्राथमिक शाळा ही तालुकास्तरीय मूल्यांकनामध्ये  गुणानुक्रमे तालुक्यात दुसरी येवून दोन लाख रुपयांचे बक्षीसासाठी पात्र ठरली आहे.
        महाराष्ट्र शासनाने या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राज्यांमध्ये राबवला. या उपक्रमांतर्गत जि प शाळांचा एक गट व स्थानिक संस्थांचा एक गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा राबवली या उपक्रमांमध्ये सहभागी शाळांनी त्यांच्या शाळेत कोणकोणते उपक्रम राबविले त्यामध्ये विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट, शालेय परिसरात वृक्षारोपण व त्यांची जोपासना, विद्यार्थी मंत्रीमंडळ स्थापन करून त्यांच्यामार्फत शालेय कामकाज, शालेय पोषण आहार योजनेचे नियोजन, शाळेत परसबाग तयार करून त्यातील पालेभाज्यांचा पोषण आहारामध्ये वापर, रोपवाटीका व बचत बँक तयार करणे, महावाचन चळवळ राबवणे, वेगवेगळ्या क्रीडा,वक्तृत्व, लेखन स्पर्धेचे आयोजन, शालेय भिंती व संरक्षण भिंतीची रंगरंगोटी, शालेय परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छता मॉनिटर नियूक्त करणे किशोर वयीन मुलींना समुपदेशन, बँके व पोस्टातील व्यवहाराची माहिती, तंबाखू व प्लॅस्टिक मुक्त शाळा या व इतर अनेक घटकांचे मूल्यमापन केंद्र स्तर, तालुका स्तरावर करण्यात आले.
     या यशाबद्दल भुतमूगळी जिल्हा परिषद शाळेचा येथील पंचायत समिती, खाजगी मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा लातूर यांनी सत्कार केला. हे यश संपादन करण्यासाठी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, गटशिक्षणाधिकारी  सुरेश गायकवाड, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय भुतमुगळी, शाळा व्यवस्थापन समिती भुतमुगळी, पालकवर्ग व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव गुंडूरे, विनायक गायकवाड, सत्यजित हिरास, कुमार बोयणे, सुनिल टोंपे, संचय जमादार, दिपीका कुलकर्णी, रेखा कार्लेकर व सेवक उद्धव हासुरे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR