41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरवाहनांवरील ध्वनीक्षेपकास सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच परवानगी

वाहनांवरील ध्वनीक्षेपकास सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच परवानगी

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेचे कलम ३२४ खाली प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निवडणुका विना अडथला व शांततेत पार पडण्य्साठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. त्यामुळे निवडणूक काळात लातूर जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केला आहे.
कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त्त सकाळी ६ वाजलेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची रीतसर परवानगी घेवून करता येईल. असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी ६ वाजलेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा निवडणुकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकांचा वापर वाहन्वर बसवून किंवा अन्य प्रकारे करणाराा  लोकांनी ध्वनीक्षेपकाच्या वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्म्गीत केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हे आदेश लातूर जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या हद्दीत १० मेपर्यंत अंमलात राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले  आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR