36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी केली विविध मतदान केंद्रांची पाहणी

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी केली विविध मतदान केंद्रांची पाहणी

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील विविध मतदानकेंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी भेटी दिल्या.  गोदावरी लाहोटी कन्या शाळा येथील सखी मतदान केंद्रावरील सुविधांची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि पोलीस  अधीक्षक मुंडे यांनी पाहणी केली. तसेच तेथील मतदारांकडून या सुविधांबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथील ग्रीन लातूर मतदान केंद्राला जिल्हाधिका-यांनी भेट दिली. तसेच येथे साकारलेली संकल्पना लातूरकरांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते मतदारांना रोपांचे वाटप करण्यात आले.  राजेवाडी येथील पर्यावरण पूरक मतदान केंद्राला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी भेट दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR