33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरमतदारांना रोपे, वृक्षांच्या बियांचे वाटप करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश

मतदारांना रोपे, वृक्षांच्या बियांचे वाटप करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघात यावर्षी प्रथमच इकोफ्रेंडली मतदान केंद्रांची संकल्पना राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांतर्गत लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथे ‘ग्रीन लातूर’ संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.
याठिकाणी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणपूरक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी मतदानाला येणा-या प्रत्येक मतदाराला रोपटे देवून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करण्यात येत होते. यासोबतच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील सुमारे ३६३ मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बियांचे मतदारांना वाटप करण्यात आले. यामाध्यमातून जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळ वाढविण्याचे, वृक्ष संवर्धनाचे आवाहन करण्यात आले. यासोबतच लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सर्व सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक महिला नियंत्रित मतदान केंद्र, दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र, युवा नियंत्रित मतदार केंद्र तयार करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR