झेरॉक्स दुकानात सापडले ३५०० एसआयआर फॉर्म

भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा, ४ बीएलओ निलंबित
नवी मुंबई : प्रतिनिधी
जिल्ह्यातील खारघरमध्ये एसआयआर फॉर्मवरून राजकीय राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एका झेरॉक्स दुकानात हजारो एसआयआर फॉर्म झेरॉक्स केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी दुकानात धाव घेतली. यावेळी हे फॉर्म झेरॉक्ससाठी घेऊन आलेला व्यक्ती भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचे समोर आले. या प्रकरणी ४ बीएलओंना निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हे प्रकरण अतिशय गंभीर असून, केवळ बीएलओंना निलंबित करून भागणार नाही तर त्यांना आदेश देणा-या अधिका-यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात हजारो एसआयआर फॉर्म झेरॉक्स केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी दुकानात धाव घेतली. त्यावेळी ठाकरे गट आणि भाजप पदाधिका-यांमध्ये झटापट झाली. खारघर पोलिस या प्रकरणाची दखल घेत नसल्याने पोलिस ठाण्यात ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन केले.

या प्रकरणी अखेर भाजप कार्यकर्ता सुरज पाटील याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाच बीएलओ प्रतिनिधींना रायगड जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे. भाजप कार्यकर्ता सुरज पाटील याच्याकडून ३५ हजार एसआयआर अर्ज ताब्यात घेवून सील करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने
उत्तर द्यावे : रोहित पवार
या प्रकरणात ४ बीएलओंना निलंबित केल्याचे समजते. पण, केवळ बीएलओंना निलंबित करून भागणार नाही तर त्यांना आदेश देणारे अधिकार कोण आहेत? तेही निलंबित झाले पाहिजेत आणि भाजप कार्यकर्त्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. जागरुक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला म्हणून लाजेखातर ही कारवाई केली असेल, पण याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news