झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच हल्ला; मुलीचा जागीच अन्त, मुलगा गंभीर

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका जन्मदात्या बापाने स्वत:च्या दोन निष्पाप लेकरांवर झोपेत असताना कु-हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या अमानुष हल्ल्यात १३ वर्षीय मीरा हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा ११ वर्षीय भाऊ रामू गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही मुले घरात गाढ झोपेत होती. याचवेळी त्यांचे वडील सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) याने हातातील कु-हाडीने दोन्ही मुलांवर अचानक हल्ला केला. झोपेत असल्यामुळे मुलांना स्वत:चा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर वारांमुळे मीराचा जागीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच शेजारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी रामूला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

हल्ल्यानंतर आरोपीचे जंगलात पलायन
हल्ला केल्यानंतर आरोपी सुभाष भिलाला हा जवळील जंगलाच्या दिशेने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून व्यापक शोधमोहीम राबवली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे हल्ल्यामागील कारणाबाबत कसून चौकशी सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news