टीईटी पेपरफुटीचे दिल्ली कनेक्शन उघडकीस ; दीड कोटीचा व्यवहार

मुंबई : प्रतिनिधी
शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. रविवारी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत परीक्षेपूर्वी मुख्य पेपरमधील प्रश्न फोडण्यात आले आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात तीन जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामागे दिल्ली कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान या पेपरफुटीचा फटका ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींना बसला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. आज या परीक्षेचा पेपर होणार होता. मात्र काल भिवंडीतील कोनगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही जण टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टीईटी परीक्षेचे चार प्रश्नसंच जप्त करण्यात आले.

संबंधित आरोपींना अटक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिका-यांनी या प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली असता त्यातील काही प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

पेपरफुटीचे दिल्ली कनेक्शन
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा पेपर दिल्लीहून आणण्यात आला होता आणि त्याचा व्यवहार तब्बल दीड कोटी रुपयांत ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा पेपर नेमका कोणाला विकण्यात येणार होता, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर ठिकाणीही प्रश्नपत्रिका विकली गेली आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नसून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणावरून लातूरमध्ये एल्गार; ६ जुलैला भव्य मोर्चा!
10:13
Video thumbnail
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस;हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचा अंदाज
04:03
Video thumbnail
Latur|अवैध दारू विक्री करणारा ढाबा संतप्त नागरिकांनी जाळला
04:42
Video thumbnail
Latur|उदगीर तालुक्यात समाधानकारक पाऊस; खरीप पेरणीला वेग
01:21
Video thumbnail
BREAKING : वाशीत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
01:03

Latest news