ठाकरेंचे ४ खासदार दिल्लीत!

ऑपरेशन टायगरची चर्चा, आज लोकसभा सभापतींची घेणार भेट?
मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला ९ पैकी फक्त ४ खासदार उपस्थित असल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ठाकरेंचे ४ खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ६ खासदार शिंदे सेनेत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्या सकाळी ठाकरे सेनेचे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊ शकतात. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यात नंदनवनवर बैठक झाली. त्यानंतर तेही रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.

नांदेड विमानतळावरून मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता चार्टर्ड विमान दिल्लीकडे रवाना झाले. यात परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख याच्यासह ३ खासदार त्यामध्ये असल्याची माहिती आहे. यासोबतच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेही दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार हे नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. हे खासदार बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय संजय दिना पाटील मुंबईत आणि ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती आहे. असे जरी असले तरी ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेसेनेत दाखल होणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. त्यात १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये ५ खासदार अनुपस्थित होते. संजय जाधव हे परभणीत धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेही अनुपस्थित होते.

संजय जाधवांना
मंत्रिपदाचं आश्वासन?
परभणीचे खासदार संजय जाधव हे आधीपासून नाराज असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोठा निधीही देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघातही मोठा निधी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात नंदनवन बंगल्यात रात्री बैठक झाली. त्यानंतर ते रात्री उशिरा दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजते. यामुळे आता ऑपरेशन टायगरला वेग आल्याची चर्चा आहे.

ठाकरे सेनेतही हालचालींना वेग
ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत हे पक्षाचे लोकसभेतील गटनेते आहेत. त्यामुळे अरविंद सावंत यांच्यासह अनिल देसाई, खा. संजय राऊत यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news