35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरडॉ. शिवाजी काळगे हे लोकांना हवे असलेले उमेदवार

डॉ. शिवाजी काळगे हे लोकांना हवे असलेले उमेदवार

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभेसाठी लोकांना हवे होते तसे उमेदवार हे डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने मिळाले आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. लातूरचे भूमिपुत्र आहेत. त्यांना समाजातील समस्यांची, सुख-दु:खाची जाण आहे. सामाजिक कार्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे. ते निवडून येण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करु. प्रचार यंत्रणा अधिक बळकट करु, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांनी केले. लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण मतदार संघामध्ये संवाद बैठकांचे सत्र सुरु असून याअंतर्गत औसा तालुक्यातील कोरंगळा, शिवली, भादा येथे रविवार दि. ३१ मार्च रोजी संवाद बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, शिवसेनेचे नेते, माजी आमदार दिनकर माने याप्रसंगी उपस्थित होते.

सरकारची गॅरंटी सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्याची आमदार धिरज देशमुख म्हणाले, आपण जोपर्यंत आपण मागे वळून पाहणार नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे कुठे जायचे आहे, हे समजणार नाही. मागच्या १० वर्षांकडे पाहताना आपल्याला केवळ वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढते महिला अत्याचार, अस्वस्थ शेतकरी बांधव, शेतकरी आत्महत्या याच समस्या प्रामुख्याने दिसतात. निवडून येण्यासाठी भाजपने जी आश्वासने दिली ती अद्याप पूर्ण झाली नाही. केवळ सर्वसामान्य जनतेला फसवले गेले. सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त करण्याची गॅरंटीच केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून केंद्रात सत्ता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी सजग राहून काँग्रेसला मतदान करावे.
लातूरमध्ये केंद्र शासनाच्या कोणकोणत्या योजना भाजपच्या खासदारांनी आणल्या, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. रेल्वे बोगी कारखाना येऊन ५ वर्षे झाले तरी अजून तो प्रत्यक्षात सुरू नाही. यासाठी ६०० कोटी रुपये खर्च केले. पण एकाही स्थानिक तरुणाला इथे रोजगार मिळाला नाही. या बोगी कारखान्यामुळे सर्वसामान्यांना किती फायदा झाला? लातूरच्या अर्थकारणात किती भर पडली? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेचे हाल : डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, लातूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, मजूर यांचे हाल झाले आहेत. शेतीमालाला योग्य भाव नाही. उच्चशिक्षित तरुणांना नोक-या नाहीत. एका जागेसाठी हजारो विद्यार्थी अर्ज करीत आहेत. त्याच परीक्षेत पेपरफुटीचा गोंधळ होत आहे. तरुणाचे भविष्य अंध:कारमय झाले. असेच महिलांचे प्रश्न आहेत. यावर मी बोलेन, प्रश्न मांडेन. यासाठी आपण मला विजयी करावे. यावेळी कोरंगळा पंचायत समिती सर्कलमधील कोरंगळा, समदर्गा, ब-हाणपूर, हळदुर्ग, लखनगाव, सत्ताधरवाडी, सत्ताधरवाडी तांडा, औसा तांडा, कुलकर्णी तांडा, सिंदाळवाडी, खुर्दवाडी, टेंभी, बोरफळ, खानापूर तांडा येथील, शिवली पंचायत समिती गणातील शिवली, बिरवली, टाका, वरवडा, जायफळ, अंदोरा, वडजी येथील, भादा पंचायत समिती सर्कलमधील भादा, भेटा, बोरगाव (न.), नाहोली, कवठा केज, काळमाथा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी किरण जाधव, अनुप शेळके, धनंजय देशमुख, शाम भोसले, डॉ अशोक पोतदार, सचिन दाताळ, सदाशिव कदम, महेंद्र भादेकर, इम्रान सय्यद, दीपक राठोड, नारायण लोखंडे, सतीश बिराजदार, आबा पवार, सतीश शिंदे, रघुनाथ शिंदे, योगीराज पाटील, राजेश शिखरे, ज्ञानदेव जंगाले, अशोक जंगाले, संदीपान शेळके, महादेव जंगाले, राजाभाऊ पाटील, शेरखाँ पठाण, संदीपान शेळके, अकबर शेख, प्रकाश भोंग, दिनकर मेंढेकर, रुद्राप्पा पावले, दगडू मुळे, निर्गुण साळुंके, संदीपान शेळके, रामभाऊ मेंढेकर, आत्माराम क्षीरसागर, अशोक पाटील, मधुकर पाटील, दीपक पावले, बाळू सुरवसे, रवी पाटील, अजय भोसले, सुधाकर खडके, लिंबराज आळणे, शिवप्रसाद शिंदे, जन्मजय गायकवाड, व्यंकट पाटील, चंद्रकांत पाटील, मजगे महाराज, किशोर जवंजाळे, सूर्यकांत उबाळे, पांडूरंग लटुरे, अशोक स्वामी, गणेश शिंदे, तय्यब पठाण, शाहुराज गवळी, दत्तकुमार शिंदे, अच्युत पाटील, व्यंकट मोहिते, महावीर क्षीरसागर, हरिदास आळणे, पांडुरंग शिवलीकर, बिभीषण कुरे, मोहन साळुंके आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR