‘ती’ अट अन् नवनीत राणांची संधी हुकली!

अमरावती : प्रतिनिधी
राज्यसभेच्या या जागेसाठी माजी खासदार, भाजप नेत्या नवतीन राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाची अट घालण्यात आली होती. नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करून राज्यसभेच्या उमेदवारीबाबत नेमकं काय घडलं? याची संपूर्ण माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नवनीत राणा यांनी पोस्ट करत लिहिले की, आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब, निर्भीड व कणखर गृहमंत्री मा. अमितजी शहा साहेब व महाराष्ट्राचे कार्यसम्राट व जननायक मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही.

मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करीत राहील. (आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्याबाबत विनंती केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही.

‘आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मन:पूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती.

सुनेत्रा पवारांचे मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरीदेखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी व पार्थदादा पवार यांची आभारी आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news