चारठाणा : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एकाच कुटुंबातील चौघे अपघातात ठार झाल्याची घटना जिंतूर – जालना महामार्गावरील गणेशपूर परिसरात रविवारी दुपारी घडली होती.
वसमत येथील या अपघातग्रस्त कुटुंंबियांना प्रशासनाने तात्काळ आर्थीक मदत जाहिर करावी, अशी मगाणी आ. राजू नवघरे यांनी विधानसभेत केली. त्यामुळे आता शासनाच्या काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चारठाणा जवळील गणेशपूर परिसरात रविवारी दुपारी झालेल्या अपघातात कार जवळपास ५० ते ६० फूट फेकल्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला होता. या भीषण अपघातात वसमत येथील एकाच कुंटुबातील कर्त्या पुरूषासह ४ जण ठार झाले. या घटनेमुळे कुटुंबातील ३ चिमुकल्या मुली उघड्यावर आल्या आहेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मयत कुटुंबियाच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत जाहिर करावी अशी मागणी वसमतचे आ. राजू नवघरे यांनी केली विधानसभेत केली. त्यामुळे शासन आता अपघातग्रस्त कुटुंबाच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

