29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरदाराशा आरोग्य केंद्रातील बंद लिफ्ट अखेर सुरू

दाराशा आरोग्य केंद्रातील बंद लिफ्ट अखेर सुरू

सोलापूर : लष्कर परिसरातील महापालिकेच्या दाराशा आरोग्य केंद्रातील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले उद्वाहक (लिफ्ट) अखेर सुरू झाल्याने या केंद्रात तपासणी व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची व नातेवाईकांची होणारी मोठी गैरसोय आता टळली आहे.
दाराशा आरोग्य केंद्रात महापालिकेचे प्रसूतीगृह देखील कार्यरत आहे. या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आजूबाजूच्या लष्कर, शास्त्रीनगर, गुरुनानक चौक, सात रस्ता परिसरातील नागरिक उपचारासाठी येत असतात, केंद्रास प्रसुतीगृह असल्याने तपासणीसाठी व केंद्रात प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. या केंद्रात प्रसूतीगृह दु‌सऱ्या मजल्यावर आहे.

महिला रूग्णांची तपासणी मात्र, खालच्या मजल्यावर करण्याची सोय आहे. अनेक महिन्यांपासून या केंद्रातील (लिफ्ट)बंद होते.त्याच्या दुरूस्तीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.या केंद्रात प्रसुतीसाठी येणार्‍या महिलांना वरच्या मजल्यावर असलेल्या प्रसूतीकेंद्रात उद्वाहक बंद असल्याने जिन्यातून पायऱ्या चढून जाताना गैरसोयीचे व त्रासदायक ठरत होते.प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलेसोबत येणाऱ्या नातेवाईकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर उशिरा का होईना महापालिका आरोग्य विभागाने रुग्णांच्या त्रासाची दखल घेत या केंद्रातील उद्वाहक सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अनेक महिन्यांपासून या ठिकाणचे उद्वाहक बंद असल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रसूती केंद्रात नेण्यासाठी आता इतरांची मदत घ्यावी लागणार नाही. उशिरा का होईना महापालिकेच्या आरोग्य विभागाने या केंद्रात आवश्यक सुधारणा करण्यास सुरवात केली.याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले. दाराशा केंद्रातील उद्वाह‌काचे दुरुस्तीकाम पूर्ण झाले आहे.उदवाहक बंद होते. त्याच्या दुरुस्तीमुळे सध्या उद्वाहक पूर्णपणे दुरुस्त झाले आहे. अंतिम तांत्रिक तपासणी केल्यानंतर पूर्ण क्षमतेने उद्वाहक सुरू होईल.असे महापालिका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR