29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरनागरिक वाढत्या तापमानामुळे हैराण

नागरिक वाढत्या तापमानामुळे हैराण

सांगोला: एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीचा पारा चढतत असताना दुसरीकडे सूर्य आग ओकू लागला आहे. दिवसा ४२ पर्यंत तापमान, सायंकाळच्या वेळी वादळी वारे व कुठेतरी हलकासा अवकाळी पाऊस अन् रात्री पुन्हा वाढते तापमान यामुळे सध्या नागरिक वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत.

रणरणते ऊन अन् उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळीच्या ईशार्‍यानंतर आता हवामान खात्याने पुढील काही दीवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कामगार वर्ग सोडल्यास अधिकतर नागरिकांनी घरात राहणे पसंत केल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत, तापमानाचा पारा वाढला असून सुर्य आग ओकू लागला आहे.काही दिवसांपासून शहरात उन्हाचे चटके अधिकच जाणवू लागले आहेत. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. तसेच पुढील काही दिवस उष्णतेचा पारा वाढणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उष्णतेची जाणीव अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिक टोपी, छत्र्या घेऊनच बाहेर पडत आहेत. तर, अनेकांनी शीतपेयांच्या गाळ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने रस्ते दुपारी निर्मनुष्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी दहानंतर वाढलेल्या तापमानामु‌ळे सायंकाळी सातपर्यंत उष्ण झळा कायम राहतात.बाजारपेठेवरही याचा परिणाम पहावयास मीळत आहे.उन्हात खरोखरच घराबाहेर पडायची गरज असेल तर संरक्षणार्थ डोक्याला टोपी व डोळ्याला गॉगल लावावेत. उन्हातून घरात आल्यानंतर थंड पाणी पीणे टाळावे. अतिथंड पाणी पिल्यास मेंदुचा रक्तपुरवठा कमी होतो. नागारिकांनी आहाराचीही काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR