दुष्काळाच्या सावटातही सोने खरेदीचा उच्चांक; दिवाळीत तब्बल ६२ हजार कोटींची उलाढाल

जळगाव : प्रतिनिधी
दुष्काळ आणि महागाईचे सावट असतानाही राज्यात दीपावलीच्या कालावधीत विक्रमी सोने खरेदी करण्यात आली. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि पाडव्­याचा मुहूर्त साधून राज्यभरात तब्बल ६२ हजार कोटींची सोन्याची उलाढाल नोंदवण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. एकट्या मुंबईतच ३२ हजार कोटींचे सोने विकले गेले.

सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांनी मोड देऊन नवीन हलके कमी वजनाचे दागिने, बारसह पारंपरिक दागिन्यांची खरेदी केली. यावर्षी सराफ बाजाराला राज्यभर तेजी होती. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आले, अशी माहिती ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ने दिली आहे.
गत वर्षी दिवाळीमध्ये सोन्याचा दर १ लाख ३१ हजार रुपयांवर पोहोचला. त्यानंतर ३० डिसेंबर २०२५ रोजी सोने १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आणि तिथूनच सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. २९ जानेवारीला सोने १ लाख ८६ हजार रुपये प्रतितोळापर्यंत पोहोचले. हा चालू वर्षातील सर्वात उच्चांकी दर सराफ बाजारात नोंदविण्यात आला. यामुळे एक तोळे सोने घेताना ग्राहकाला घडणावळ आणि जीएसटीसह २ लाख ११ हजार रुपये मोजावे लागले होते.

पुढे अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात घसरण झाली. ते प्रतितोळा १ लाख ६५ हजार रुपयांपर्यंत आले. गणपतीत १ लाख ५० हजार आणि दस-याला त्याचा भाव १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत आला. दस-याच्या दिवशी सोन्याच्या दरात तोळ्यामागे ४,२०० रुपयांची घसरण झाली. दस-याच्या सणाच्या दरात प्रथमच मोठी घसरण झाली होती. पुढे दर चढ-उतरणीचा हा सिलसिला सुरूच राहिला. दिवाळीच्­या आधी दर घसरल्­याने खरेदीदारांची चांदी झाली.

दिवाळीत आणखी दरवाढ होण्याच्या भीतीने या सणासुदीच्या काळात ग्राहकांनी सोने खरेदी केले. मात्र, दिवाळीत सोन्याचा दर गणपतीपेक्षा प्रतितोळा ९,२५० रुपयांनी कमी होऊन १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत आल्याने सोने खरेदीत गेल्या दिवाळीपेक्षा दुपटीने वाढ झाली. ही तेजी राज्यातील सर्वच प्रमुख शहरांतील सराफ बाजारात होती. एकट्या जळगाव सुवर्णनगरीत अंदाजे ३५० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाली.
..

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43

Latest news