आमच्याकडून पुर्णविराम!; सुळेंनी विलिनीकरणाचा विषय संपवला

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पत्रकार परिषदेत फुल स्टॉप दिला. त्यांनी ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या माझ्या भावासोबत दिवंगत अजित पवार यांच्यासोबत सुरू होत्या. २८ जानेवारीला माझा भाऊ गेला अन् त्या चर्चांना फुल स्टॉप लागला. त्यानंतर आमच्याकडून कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत असे म्हणत आता या चर्चांचा कंटाळा आला आहे. आमच्याकडून हा विषय संपला असल्याचं उद्विग्नपणे सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. शरदचंद्र पवार गट हा एनडीएमध्ये जाणार कोणाला मंत्रीपद मिळणार याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत. सध्या विलिनीकरणाबाबत पवार कुटुंबाकडून कोणतीही चर्चा सुरू नाहीये असं सांगितलं. त्यांनी अजित पवार हयात होते त्यावेळी याबाबत चर्चा झाली होती अन् ती जगजाहीर झाली होती. असं सांगत ती चर्चा भावासोबतची होती आता भाऊच नाही म्हटल्यावर कोणती चर्चा नाही असे भावून होत सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.

जगात बरेच गंभीर प्रश्न
सुप्रिया सुळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडोमोडी घडत आहेत. त्याबाबत दिल्लीत देखील याचा देशावर होणारा परिणाम याबाबत चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे नेतृत्व तसेच शिवसेना उबाठा अन् तृणमूल काँग्रेसचे देखील खासदार जेपीसीच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भेटीगाठी होत असतात असं म्हणत कथित बैठकांबाबत खुसाला केला.

डीलिमिटेशन बाबत भाष्य
पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी डीलिमिटेशनबाबत देखील आपली भूमिका काही प्रमाणात स्पष्ट केली. याच डीलिमिटेशन बीलसाठीच सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादीच्या ८ खासदारांची गरज असल्याचा तर्क गेल्या काही दिवसांपासून दिला जात होता. त्यासाठीच हे विलिनीकरणाचा घाट घातला जात असल्याचे विश्लेषण अनेक जाणकारांनी केलं होतं. आता याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला ढोबळमानाने डीलिमिटेशन ठीक वाटलं. कारण आमचे मतदार संघ हे २० ते २५ लाखांचे झाले आहेत. इतके मोठे मतदार संघ कोणत्याही खासदाराला मॅनेज करणे अवघड आहे. जर सरसकट जागा ५० टक्क्यांनी वाढल्या तर डीलिमिटेशनला पाठिंबा देण्याबाबत विचार करू असे सुचक उत्तर दिलं

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43

Latest news