31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरदेवणीचे नगराध्यक्ष टाळे ठोकून करणार उपोषण

देवणीचे नगराध्यक्ष टाळे ठोकून करणार उपोषण

देवणी : प्रतिनिधी
देवणी नगर पंचायत समितीला दिड वर्षापासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने विकास कामे रखडली असून सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्याधिकारी गजानन शिंंदे यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढण्याची मागणी नगराध्यक्षा डॉ. कीर्र्ती घोरपडे यांनी जिल्ह्यासह आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास नगर पंचायतीस टाळे ठोकण्याचा व बेमुदत उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणी जिल्हा सह आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

मुख्याधिकारी गजानन शिंदे हे मागील दीड वर्षापासून देवणी नगरपंचायतीचा अतिरक्ति पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना नगरपंचायतीत पूर्ण वेळ देता येत नाही. परिणामी विकास कामे व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविणे शक्य होत नसून सभागृह व त्यांच्यातही समन्वय राखला जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. सर्वसामान्याचे व सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे व विकास कामे व्हावेत म्हणुन सभागृहात त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला आहे. यासंबंधीचा अर्ज सह आयुक्तांकडे यापूर्वी सादर करण्यात आला आहे. परंतु आजतागायत त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा सोमवारी (दि. ४) नगरपंचायतीस टाळे ठोकण्याचा व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्षा डॉ . कर्तिी घोरपडे यांनी जल्हिा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जल्हिाधिकारी कार्यालय, लातूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR