39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीदीपक सोळंके, विठ्ठल अनमूलवाड यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

दीपक सोळंके, विठ्ठल अनमूलवाड यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

परभणी : शिक्षक फौंडेशनद्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे परभणी जिह्यातील दीपक सोळंके आणि विट्ठल अनमूलवाड या दोघांची राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण नाशिक येथे १४ मे रोजी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होणार आहे.

दीपक सोळंके हे सेलू तालुक्यातील जि.प.कान्हड शाळेवर कार्यरत असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवत आहेत. तर विठ्ठल अनमूलवाड हे अभिनव विद्याविहार प्रशाला पूर्णा येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यवेधी शिक्षण देत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड महाराष्ट्र शिक्षक पॅनल अध्यक्ष दीपक चामे, उपाध्यक्ष मेघराणी जोशी, सचिव सतीश कोळी, सहसचिव राजश्री पाटील परभणी जिल्हा समन्वयक संतोष रत्नपारखे, रहेमान पठाण यांनी केली आहे. या संदर्भातील नुकतेच निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR