नगरपालिका निवडणुकीत युवाशक्तीचा डंका!

सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ हा भाजपचा आणि विशेषत: माजी आमदार राजन पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडले आहे. २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा १७० मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालाने सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नगराध्यक्ष पदासोबतच नगरपरिषदेच्या एकूण २० जागांपैकी ९ जागांवर शिवसेनेने विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

राजकारण बाजूला ठेवून शहराचा विकास करणार – सिद्धी वस्त्रे
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, हा विजय म्हणजे मोहोळच्या जनतेने माझ्यावर टाकलेली मोठी जबाबदारी आणि दाखवलेला विश्वास आहे. निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या वयावरून आणि अनुभवावरून माझ्यावर अनेक टीका करण्यात आल्या. मात्र, आजच्या निकालाने त्या सर्व टीकेला चोख उत्तर दिले आहे. आता राजकारण बाजूला ठेवून शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता असेल.

सौरभ तायडे हे सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष
दरम्यान, सिंदखेड राजा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सौरभ तायडे हे सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष ठरले आहेत. त्यांचे वय २१ वर्ष १० महीने आहे. युवा उमेदवार सौरभ विजय तायडे यांनी अवघ्या १६९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. ते सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष ठरले आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45

Latest news