नणंद येथे पाझर तलावालगत बेकायदेशीर उत्खनन

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील नणंद येथील घाडगेनगर वस्तीच्या पश्चिमेस असलेल्या पाझर तलावालगत सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे गावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.
देवसाळे यांच्या शेतालगत असलेल्या पाझर तलावाच्या पाळूला अवघ्या ५० फूट अंतरावर मागील एक महिन्यापासून दोन पोकलेन व सुमारे २५ हायवा वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन सुरू आहे. पाळूला लागूनच उत्खनन होत असल्याने भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास तलावात पाण्याचा साठा वाढून पाळू कमकुवत होण्याची व तलाव फुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तलाव फुटल्यास घाडगे नगर वस्तीमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच उत्खननातून काढलेला मुरूम राज्य महामार्ग क्रमांक २३८ च्या कामासाठी वापरला जात असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
या संदर्भात जलसंधारण विभागाचे अधिकारी शेलार यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली असून त्यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिल्याचे प्रा. मिरगाळे यांनी सांगितले. दरम्यान, बेकायदेशीर उत्खनन तातडीने बंद करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जलसंधारण अधिकारी तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news