33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात मुसळधार पावसाची हजेरी

नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी

नागपूर : राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशातच विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी कामाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नागपुरात सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भर दिवसा सर्वत्र काळोखासह पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यावरील वाहनांना अंधारामुळे दिवसा वाहनाचे दिवे लावावे लागत आहेत. हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

नागपुरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या पावसामुळे शेतक-यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आज अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, अकोला, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR